पंजाबराव डख लाईव्ह ; पुढे पाच या भागात अतिवृष्टी होणार पंजाबराव डख अंदाज..

पंजाबराव डख लाईव्ह ; पुढे पाच या भागात अतिवृष्टी होणार पंजाबराव डख अंदाज...

पंजाबराव डख लाईव्ह ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 24/ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार डख यांनी 27/ऑगस्ट पर्यंत राज्यातील अनेक जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे, पाहुया सविस्तर हवामान अंदाज.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आजपासून पुढे 27/ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

 

या दरम्यान पाऊस काहिसा उघडणार – पंजाबराव डख..

पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार आजपासून 27/ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज असून 28/ऑगस्ट, 28/ऑगस्ट, 30/ऑगस्ट दरम्यान ढगाळ वातावरण व पाऊस काहिसा उघडणार आहे. हे तिन दिवस सूर्यदर्शन होईल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

 

या तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार..

पंजाबराव डख म्हणतात 31/ऑगस्ट पासून 04/सप्टेंबर पर्यंत पून्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे. वारे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे तरी झाडाखाली न थांबण्याचे तसेच पाळीव प्राणी झाडाखाली न बांधण्याचे डख यांनी सांगितले आहे.

पंजाबराव डख म्हणतात दुपारपर्यंत कडक उन पडेल व दुपारनंतर काळेकुट्ट आभाळ येईल व त्या ठिकाणी जोरदार वारे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. झाडावर विजा पडण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे पाळीव प्राणी तसेच स्वत पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबु नये. पाऊस सुरू असताना लवकर सुरक्षित ठिकाणी थांबावे. (पंजाबराव डख)

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com