नमो शेतकरी योजना ; पिएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तिन हप्ते वितरीत झाले असून आता चौथ्या हप्त्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. फेब्रुवारी मध्ये पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते वितरीत केले होते.
नमो शेतकरी योजना
फेब्रुवारी नंतर आता चौथ्या हप्त्यांला येण्यास थोडासा उशीर झाला आहे. हप्ता येण्यासाठी उशीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या तसेच काही शेतकरी नमो शेतकरी योजना बंद केली का असे कमेंट्स मध्ये विचारत होते. अखेर शासनाने नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरीत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्यासाठी शासनाने 2041 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. लवकरच चौथा हप्ता कधी वितरीत होणार याबाबत तारिख निश्चित होईल.
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येण्यासाठी तुमची ई-केवायसी आणि आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव असने आवश्यक आहे. नमो शेतकरी, पिएम किसान, लाडकी बहिण, ईतर शासकीय अनुदान शासनाकडून थेट DBT द्वारे टाकले जातात आणि ज्या खात्याला आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव असेल त्या खात्यात हे पैसे जमा होत असतात.
नमो शेतकरी योजना ; तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार का हे तपासण्यासाठी ई-केवायसी पुर्ण आहे का तपासा तसेच आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव आहे का ते तपासा जर नसेल तर लवकर करून घ्या म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येण्यासाठी अडचण येणार नाही.