आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव करा घरबसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईल वर..
आधार सिडिंग स्टेटस ; अनेक महिलांचे लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा न झाल्यामुळे आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव करण्यासाठी बॅंकेत मोठी गर्दी होत आहे. आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव नसल्याने लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले नाहीत. बॅंकेत मोठी गर्दी होत असल्याने आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या बॅंकेशी आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव करु शकतो.
आधार सिडिंग स्टेटस बॅंक खात्याला कसे ॲक्टिव करावे याबाबत सविस्तर माहिती या लेखात पाहुया. संपूर्ण स्टेप पुर्ण करून तुम्ही तुमच्या आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव करु शकता.
सर्वप्रथम ncpi.org.in या वेबसाइटला भेट द्या.
1) त्यानंतर Consumer वर क्लिक करा.
2) Next वर क्लिक करा – भारत आधार सीडिंग सक्षम (BASE).
3) पुढे – आधार सीडिंगसाठी विनंती पेज उघडेल.
4) तुम्हाला जो आधार क्रमांक जोडायचा आहे तो एंटर करा.
5) पुढे – आधारसाठी विनंती या पर्यायामध्ये तुम्हाला दोन पर्याय मिळतील 1- सीडिंग 2- डी-सीडिंग, आधार लिंक करण्यासाठी सीडिंग पर्याय निवडा.
6) त्यानंतर तुमची बँक निवडा आणि ज्या बँकेचे खाते तुम्हाला आधारशी लिंक करायचे आहे त्या बँकेचे नाव निवडा.
7) पुढे Seeding Type हा पर्याय दिसेल, त्यात तीन पर्याय आहेत, Fresh Seeding हा पर्याय निवडा.
8) जे नागरिक प्रथमच त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक करत आहेत त्यांनी नवीन सीडिंगचा पर्याय निवडला पाहिजे.
9) पुढे बँक खाते क्रमांक दोनदा टाकून खाते क्रमांकाची पुष्टी करा.
10) पुढे दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करा आणि खाली Captcha टाका आणि continue वर क्लिक करा.
11) पुढील अटी आणि नियम वाचा आणि Agree आणि Continue वर क्लिक करा.
12) पुढे मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल आणि OTP टाकल्यानंतर Sumbit पर्यायावर क्लिक करा.
13) पुढे बँक खात्याशी आधार लिंक झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी होम पेजवर जा आणि रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगच्या समोर असलेल्या बानावर क्लिक करा.
14) पुढे गेट आधार मॅप केलेले स्टेटस पर्यायावर क्लिक करा.
15) पुढे – तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि एक OTP येईल, तो प्रविष्ट करा आणि तुम्हाला आधार मॅप केलेली स्थिती दर्शविली जाईल.
16) जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असेल, तर तुम्हाला मॅपिंग स्थितीमध्ये DBT साठी सक्षम असे दाखवले जाईल.
वरील संपूर्ण स्टेप पुर्ण करुन तूम्ही आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव करु शकता. अधिक माहिती खालील YouTube video पहा ..